विविध योजनांच्या आयोजनाला नागरिकांचा प्रतिसाद, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके यांनी केले आयोजन

विविध योजनांच्या आयोजनाला नागरिकांचा प्रतिसाद, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके यांनी केले आयोजन


नवीन पनवेल : रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास नारायण फडके व ग्रुप ग्रामपंचायत चिपळे यांच्या वतीने पाच नोव्हेंबर रोजी विविध योजनांचे आयोजन सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आले होते. या योजनांच्या आयोजनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

         पनवेलच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आजही शासकीय विविध योजना माहिती नाहीत त्या अनुषंगाने शेतकरी कामगार पक्षाचे विलास फडके आणि ग्रुप ग्रामपंचायत चिपळे यांच्या वतीने या विविध योजनांचे आयोजन केले होते. नागरिकांना यावेळी ई श्रम आणि हेल्थ आयडी, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्डसह सर्व अपडेट समस्यांचे निवारण करण्यात आले. तसेच नवीन मतदान नोंदणी करण्यात आली. घरकाम करणाऱ्या महिलांसाठी योजनांची माहिती देऊन त्यांचे निरसन करण्यात आले. निराधार आणि विधवा महिला पेन्शन योजना सुरू करण्यात आली. हनुमान मंदिर हॉल, विहिघर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या योजनांचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाला नामदेवशेठ फडके, माजी सरपंच कांता फडके, सरपंच हिंदोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.