बालनाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे पनवेलमध्ये आयोजन
पनवेल(प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली.लवकरच बालनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने तसेच इतर स्पर्धाच्या तयारीच्या दृष्टिकोनातून कलाकारांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षण कार्यशाळेचे शुक्रवार दिनांक ११ नोव्हेंबरला पनवेलमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
या पुर्वी झालेल्या सहविचार सभेत शिक्षकांनी केलेल्या विनंती नुसार, दि.११ नोव्हेंबर रोजी दुपारी ०३ ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत या वेळेत मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात नाट्यलेखन प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेमध्ये बालनाट्य हा काय साहित्यप्रकार आहे, त्याचे लेखन आणि उद्दिष्ट, विषयाची निवड आणि कथेचा विस्तार त्याचबरोबर पात्र निर्मिती आणि प्रसंग विस्तार संवाद लेखन नाट्य वाचन आणि फायनल ड्राफ्ट या सर्व गोष्टी बाबत चर्चा होऊन मार्गदर्शन होणार आहे. या साठी सुप्रसिद्ध बालनाट्य लेखक दिग्दर्शक राजू तुलालवार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यशाळेसाठी १०० रुपये माफक शुल्क असून इच्छुकांनी शामनाथ पुंडे- ९८२१७५८१४७ किंवा संतोष चव्हाण - ९८६९९६७८४७ यांचयाकडे १० नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.