शिक्षक आमदारांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता;शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बहुतांश मागण्या पूर्ण करण्याचे दिले आश्वासन

शिक्षक आमदारांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता;शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बहुतांश मागण्या पूर्ण करण्याचे दिले आश्वासन



मुंबई प्रतिनिधी-गेले २ दिवस विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आमदार बाळाराम पाटील,आमदार सुधीर तांबे, आमदार अभिजित वंजारी, आमदार विक्रम काळे, आमदार जयंत आसगावकर, आमदार किशोर दराडे, आ. किरण सरनाईक,आमदार राजेश राठोड यांच्यासह विधिमंडळाच्या प्रांगणात धरणे आंदोलन करत होते. मुंबईतील आझाद मैदानावर सुरु असलेले विविध शिक्षक संस्थांच्या आंदोलनाची तसेच या आंदोलनाची दखल घेत राज्याचे माननीय शिक्षणमंत्री ना. दिपकजी केसरकर यांनी आमदार महोदयांसोबत बैठक घेऊन प्रदीर्घ चर्चा करत सर्व मागण्या समजून घेतल्या. 

कालच शिक्षण सचिव व शिक्षण अधिकार्‍यांनी शिक्षणमंत्र्यांचे पत्र आमदार महोदयांना दिले.पण त्यावर न थांबता शिक्षणमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्याचा आग्रह यावेळी सर्व आमदार महोदयांनी धरला .आज दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळी हा आग्रह पूर्ण झाला.यावेळी सन २०१२-१३ च्या नैसर्गिक वाढीच्या वर्ग, तुकड्यांना शंभर टक्के अनुदान लागू करण, अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना निधीसहीत घोषित करणे, अंशतः अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान लागू करणे, घोषित त्रुटी पात्र शाळेचा शासननिर्णय निर्गमित करणे, विनाअनुदानित व अंशअनुदानित शिक्षकांना सेवासंरक्षण लागू करणे, २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करणे तसेच वाढीव पदांना अनुदान मिळावे या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. 

या संदर्भात शिक्षण मंत्री महोदयांनी तातडीने माननीय मुख्यमंत्री यांची भेट घेऊन तसेच उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली.तद्नंतर त्यांनी विधिमंडळाच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली की अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत दिलेल्या आश्वासनानुसार निर्णय घेऊन यातील अधिकाधिक मागण्यांची पूर्तता शासन करणार आहे. यामुळे जवळपास ३५ ते ४० हजार शिक्षकांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळणार आहे. आंदोलनाची दखल घेत त्वरीत पुढील पावले उचलल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्र्यांचे आभार कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांनी मांनले आहेत.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image