राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत व जिल्हा समन्वय समितीची बैठक संपन्न

     *अलिबाग,दि.23 (जिमाका):-* राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत व जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली दि.22 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.

     यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ.गजानन गुंजकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, जिल्हा प्रशासन अधिकारी शाम पोशट्टी, डॉ.प्रताप शिंदे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी, डॉ.शितल जोशी, जिल्हा पी.पी.समन्वयक श्री. सतिश दंतराव श्री.राजेंद्र भिसे, श्रीमती ए.व्ही. शिंदे, श्री.संतोष पाटील, श्री.आदित्य गावंड, पुरूषोत्तम जैस्वाल तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.विनायक पाटील, पनवेल महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी, भारतीय परिचारिका असोसिएशन तसेच अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी, शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

     यावेळी बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, सरपंचांनी जिल्ह्यातील सर्व क्षयरोग रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना सहा महिन्यापर्यंत पोषण आहार वाटप करावे, तसेच महाड येथील निक्षय मित्र श्री.सोमनाथ ओझरडे यांचा राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलेल्या सत्कारासंबंधीचा उल्लेख करून त्यांचा इतरांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.

     मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी गावनिहाय रुग्णांची यादी मागवून तेथील सरपंचांना, लोकप्रतिनिधींना, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्याद्वारे क्षयरोग रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषण व सकस आहार देण्यात यावे, याकरिता आवाहन केले आहे.

     क्षयरुग्णांना सामाजिक साहाय्य व पोषक व सकस आहार देण्यासाठी जिल्हा लोकप्रतिनिधींनी, सामाजिक संस्थांनी, औद्योगिक क्षेत्रांनी, लायन्स क्लब, रोटरी क्लब, तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी क्षयरोगग्रस्त रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना किमान एक वर्ष पोषण आहार व सकस आहार द्यावा. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्या रुग्णांना जो अशक्तपणा येतो, भूक मंदावते व टी.बी. गोळ्या खाऊन तो अधिक अशक्तही होतो, या रुग्णांना पौष्टिक व सकस आहार मिळाला तर ते या आजारातून लवकर बरे होऊ शकतील. यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील कंपन्यांना, लोकप्रतिनिधींना याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.

     निक्षय मित्र होण्यासाठी गुगलवर https://www.nikshay.in/ या संकेतस्थळावर जाऊन त्यामध्ये “community support to TB patient” यावर क्लिक करून, त्यात निक्षय रिपोर्टस् यावर क्लिक केल्यास त्यात निक्षय मित्र फॉर्म ओपन होतो, त्यामध्ये सर्व माहिती भरून अर्ज अपलोड करावा, त्यानंतर आपल्याशी जिल्हा क्षयरोग कार्यालयाकडून संपर्क साधण्यात येईल. त्यावेळी आपणास सर्व माहिती दिल्यानंतर आपले निक्षय मित्र म्हणून रजिस्ट्रेशन केले जाईल. अशा प्रकारे सर्वानी या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

     आतापर्यंत जिल्ह्यात 9 निक्षय मित्र झाले असून त्यापैकी दोन सामाजिक संस्था आहेत. तर वैयक्तिक जणांनी क्षयरुग्णांना दत्तक घेतले आहेत. यापैकी 153 जणांना पोषण आहार वाटप करण्यात आले आहे. त्यासाठी एका निक्षय मित्राचा राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

*राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत व जिल्हा समन्वय समितीची बैठक संपन्न*

Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image