ज्येष्ठ नागरिक यशोदा कडवे यांचे निधन
पनवेल(प्रतिनिधी) गुळसुंदे गावातील ज्येष्ठ नागरिक यशोदा उर्फ येसूबाई महादेव कडवे यांचे वयाच्या ८० व्या वर्षी (दि. ११) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.
यशोदा यांच्या पार्थिवावर गुळसुंदे येथील स्मशानभूमीत कोरोना संदर्भातील नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नातेवाईक, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रेमळ व हसतमुख स्वभाव असा यशोदा कडवे यांचा स्वभाव होता. त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार दिनांक २० जानेवारी रोजी श्रीक्षेत्र गुळसुंदे येथे तर उत्तरकार्य रहात्या घरी रविवार दिनांक २३ जानेवारीला होणार आहे.