निधी अभावी रखडलेले उरण तालुक्यातील फुंडे येथील मंजूर उपजिल्हा रुग्णालय आणि फुंडे, मातवली, पिरकोन, आवरे, वशेणी येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची प्रितम म्हात्रे यांची मागणी

निधी अभावी रखडलेले उरण तालुक्यातील फुंडे येथील मंजूर उपजिल्हा रुग्णालय आणि फुंडे, मातवली, पिरकोन, आवरे, वशेणी येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची प्रितम म्हात्रे यांची मागणी



पनवेल : निधी अभावी उरण तालुक्यातील रखडलेले फुंडे येथील मंजूर उपजिल्हा रुग्णालय आणि फुंडे, मातवली, पिरकोन, आवरे, वशेणी येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी प्रितम म्हात्रे यांनी आदिती तटकरेपालकमंत्री, रायगड जिल्हा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

            उरण तालुक्यात कित्येक वर्षांपासून आरोग्य सेवेपासून येथील नागरिक वंचित आहेत. सर्प दंश आणि अपघात झाल्यास येथील नागरिकांना नवी मुंबई अथवा पनवेल गाठावे लागते. हे अंतर दूर असल्याने कैक नागरिकांचे उपचार अभावी आपले प्राण गमवावे लागले आहेत. उरण तालुक्यामधील फुंडे येथे उपजिल्हा रुग्णालयाकरीता भूखंड आरक्षित करण्यात आला आहे. त्यानुसार फुंडे, मातवली, पिरकोन, आवरे, वशेनी येथे उपकेंद्र मंजूर आहेत. परंतु निधीअभावी हे केंद्र अद्याप उभारण्यात आले नाहीत. त्यामुळे आपण तातडीने निधी उपलब्ध करून आरोग्य सेवेचा प्रश्न मार्गी लावावा असे प्रितम जनार्दन म्हात्रे, विरोधी पक्ष नेते यानी निवेदनाद्वारे आदिती ताई तटकरेपालकमंत्री, रायगड जिल्हा कळविले आहे.