फ्लॅट भाड्याने घेऊन फसवणूक करणारे दोघे जण गजाआड
पनवेल दि.24(वार्ताहर)- इस्टेट एजंटचे काम करणाऱ्या एका तरूणाच्या जागरूकतेमुळे बनावट नाव व कागपत्रांद्वारे फ्लॅट भाड्याने घेऊन गैर कृत्य करणाच्या प्रयत्नात असलेले दोघे भामटे पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याची घटना खारघरमध्ये घडली आहे. पृथपालसिंग सहोता (वय-48) आणि अनमोल सिंग उर्फ अमरिकसिंग बामारा (वय-60) अशी या दोघा भामट्यांची नावे असून खारघर पोलिसांनी या दोघांवर फसवणूकीसह बनावटगिरीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. या दोघांनी फ्लॅट मालकाची फसवणूक करण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून सदर प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले असले तरी खारघर पोलिसांकडून या दोघांची कसून चौकशी करण्यात येत आहे.