शेकापचे जेष्ठ नेते स्व.शंकर पाटील यांना अभिवादन

 शेकापचे जेष्ठ नेते स्व.शंकर पाटील यांना अभिवादन


पनवेल : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय शंकर शेठ शिवराम पाटील यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पनवेलच्या शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी स्वर्गीय शंकर शेठ पाटील यांना अभिवादन करण्यासाठी आमदार बाळाराम दत्तात्रय पाटील, पनवेल नगर परिषदेचे माजी आदर्श नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे माजी पनवेल तालुका चिटणीस जेष्ठ नेते नारायण शेठ घरत, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती डॉ. दत्तात्रेय पाटील, संचालक संतोष पाटील, सहकारी भात गिरणीचे चेअरमन एम सी पाटील, संचालक गणेश गायकर, संचालक भाई तांबोळी, पंढरीनाथ झिंगे, सुनील मोकल, कृष्णा पाटील, प्रकाश आमरसकर आदी मान्यवर सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.