ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी यांना जीवन गौरव पुरस्कार ....

 ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी यांना जीवन गौरव पुरस्कार ....


पनवेल(प्रतिनिधी)-पनवेल- पत्रकार दिनानिमित्त पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार, पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी यांना पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

       यावेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, शिवसेना नेते रामदास शेवाळे, मनसेचे संजय मिरकुटे, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार अकबर सय्यद उपस्थित होते.

              गणेश कोळी यांनी लोकसत्ता,कृषीवल, प्रहार,नवभारत या वृत्तपत्रातून पनवेल प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे.स्वतः संपादित असलेले वृत्तपत्र पनवेल टाइम्स चालवितात काही वर्ष दैनिक आणि आता साप्ताहिक रूपामध्ये पनवेल टाइम्स प्रकाशित होत आहे.

                त्यांचे माझी पत्रकारिता हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे  360 पनवेल टाइम्स हे यूट्यूब चॅनल चालविले जात आहे. ते पनवेल मीडिया प्रेस क्लबचे अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष,ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलचे विश्वस्त या पदांवर काम करत आहेत. 

             पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर ,कोरोना काळात समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते व्यक्ती व सामाजिक संस्थांचा सन्मान, कवी संमेलन कवितेची कार्यशाळा आदी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image