२३ जानेवारीला कळंबोलीमध्ये दाखल होणार हिंदुहृदयसम्राट ज्योत;स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रायगड शिवसेनेचे आयोजन
जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडली बैठक
पनवेल : (राज भंडारी)--शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर यांसारख्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन शिवसैनिकांकडून करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, रायगड जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर, शिरीष बुटाला, बबनदादा पाटील, शिवसेना रायगड़ जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने रविवार दिनांक २३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९:०० वाजता शिवतीर्थ येथे हिंदूह्रदयसम्राट ज्योत मुंबई महानगरपालिका महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर व जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते प्रज्वलित करून कळंबोली येथे आणण्यात येणार असल्याची माहिती नुकत्याच शिवसेनेच्या रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या सभेत देण्यात आली.
सदर ज्योत मुंबई शिवाजी पार्क येथून रायगड उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, रायगड उपजिल्हा संघटक परेश पाटील, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, पनवेल तालुका संघटक भरत पाटील, पनवेल विधानसभा संघटक दिपक निकम, पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, पनवेल तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, ज्ञानेश्वर बडे, प्रथमेश सोमण, कैलाश पाटील, रुपेश पाटील, दिपक घरत, गुरुनाथ पाटील, प्रभाकर गोवारी, राकेश गोवारी, डि.एन.मिश्रा, सदानंद शिर्के, प्रविण जाधव, यतिन देशमुख, प्रकाश गायकवाड, प्रदीप केणी, जय विजय कुष्ठे, गणेश म्हात्रे. विलास पवार, संदिप पाटील, कैलाश म्हात्रे, प्रदिप केणी, कृष्णकांत कदम,अवचित राऊत, महेश भोईर, सूर्यकांत म्हसकर, गिरीश धुमाळ, ज्ञानेश्वर भंडारी, संदीप तांडेल, प्रकाश म्हात्रे यांच्या उपस्थितीत कळंबोलीत आणण्यात येणार आहे.
२३ जानेवारी वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असल्यामुळे पनवेलमध्ये हिंदुहृदसम्राट ज्योत घेवून येण्यासाठी पनवेल तालुका समन्वयक प्रदिप ठाकूर - ८६५२८४०००७ आणि पनवेल उपमहानगर संघटक सुनित पाटील - ९९२०३०६०८९ यांच्यासह गोविंद जोशी, राजेश केणी, सचिन मोरे (शिवमाथाडी कामगार सेना रायगड जिल्हा प्रमुख),संजय शेंडगे (विभाग प्रमुख कळंबोली), विवेक गडकरी (विभाग संघटक कळंबोली), प्रविण जाधव (शहर संघटक,पनवेल), भरत शिंदे, निनाद दामले, जमिल खान, टिया अरोरा, मनिषा भोसले, सुलक्षणा जगदाळे, संतोष शहाणी, शिवाजी जाधव, अंकुर पाटील, प्रतिक पाटील, अनंता सांगडेकर, मंगेश खांडगे, कामेश थोरात, कपिल जमदाडे, नरेश ढाले, कुंदन पाटील, दिनेश म्हात्रे, अक्षय पाटील, जयेंद्र पाटील, प्रमोद म्हात्रे, चंद्रकांत दुधाळ, सचिन म्हात्रे, रोहन पाटील, भगवान पाटील, रतन पाटील, महेन्द्र पाटील, दिपक पाटील, मिथुन मढवी आदींची उपस्थिती लाभणार असून कार्यक्रमासाठी शिवसैनिकांसह शिवसेना प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.