नवी मुंबई मेट्रो नोकर भरती मध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यासाठी महाविकास आघाडीचा हल्लाबोल
मेट्रो नोकर भरती मधील गैरप्रकारावर महाविकास आघाडीचे ताशेरे
पनवेल : राज भंडारी
सोमवार दिनांक २४ जानेवारी रोजी मुंबई मेट्रो (तळोजा) नोकरभरती मध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळण्यासंदर्भात पनवेल महाविकास आघाडीचे अध्यक्ष आणि लोकनेते दि बा पाटील प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील आणि पनवेल महाविकास आघाडीचे सचिव सुदाम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रकल्पग्रस्त व स्थानिक रहिवाशी यांना मेट्रो नोकरभरतीमध्ये प्राधान्य मिळावे यासाठी मेट्रो अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आवाज उठवण्यात आला. यावेळी स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्यासाठी महाविकास आघाडीने हल्लाबोल केला.
मेट्रो नोकरभरती मध्ये चाललेला गैरप्रकारासंदर्भात मेट्रो अधिकाऱ्यांना माहिती देऊन सदर गैरप्रकार तात्काळ थांबवून योग्य उमेदवाराला नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या इशारा रायगड जिल्हा समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अनिल नाईक यांनी दिला. यावेळी काँग्रेस जिल्हा चिटणीस बबन केणी आणि काँग्रेस तळोजा शहराध्यक्ष विजय केणी यांनी प्रत्यक्षात त्यांची जमीन मेट्रो प्रकल्पाला गेली असून असे अनेक प्रकल्पग्रस्त नोकरीपासून वंचित आहेत आणि इतर लोकांना मोठ्या प्रमाणावर नोकरी मधील संधी गेल्या काही दिवसांपासून देण्याचा गैरप्रकार चालू असल्याची माहिती देवून, सदर प्रकार थांबला नाही आणि स्थानिक प्रकल्पग्रस्तांना जर नोकर्या दिल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.
पनवेल महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील व सचिव सुदाम पाटील यांनी नोकरी भरती करत असताना प्रकल्पग्रस्तांची बनावट बक्षीसपत्र जोडून व बनावट कागदपत्रे जोडून होणाऱ्या नोकरी भरतीवर ताशेरे ओढले आणि असल्या गैरप्रकारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. या बैठकीत मेट्रो अधिकाऱ्यांसोबत पनवेल महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, पनवेल महाविकास आघाडीचे सचिव तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील, समाजवादी पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हा कार्याध्यक्ष ताहीर पटेल,काँग्रेस जिल्हा चिटणीस बबन केणी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल जिल्हा सचिव प्रसाद पाटील, राष्ट्रवादी पनवेल उपाध्यक्ष कासम मुलानी, शिवसेना उपशहरप्रमुख मिथुन मढवी, काँग्रेस तळोजा शहर अध्यक्ष विजय केणी आदींसह स्थानिक प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.