वावंजे प्रीमियर लीगचे शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्याहस्ते उद्घाटन-शेकापचे काशिनाथ पाटील यांच्यासह दिग्गज शिवसैनिकांची हजेरी
बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त परेश पाटील यांचे आयोजन
पनवेल (प्रतिनिधी)-स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी शिवसेनेचे रायगड उपजिल्हा संघटक परेश पाटील यांच्यामार्फत वावंजे प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात येत असते. या वर्षीही आज २३ जानेवारी निमित्त या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्याहस्ते या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा संघटक काशिनाथ पाटील, शिवसेनेचे पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम, पनवेल तालुका संघटक भरत पाटील, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, तालुकाप्रमुख रघुनाथ शेठ, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, उप तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे आदींची उपस्थिती लाभली. वावंजे येथे खेळविल्या जाणाऱ्या वावंजे प्रीमियर लीगचे भव्यदिव्य स्वरूप पाहून खेळाडूंमध्येही उत्साह दिसत होता. भरगच्च बक्षिसे आणि पारितोषिके असणाऱ्या या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये एकूण २८ संघांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी स्पर्धकांसाठी विशेष पारितोषिके परेश पाटील यांच्यामार्फत ठेवण्यात आली होती.