वृद्ध महिलेच्या दागिन्यांसह रोखरक्कम केली लंपास
पनवेल दि.24 (संजय कदम)- एका वृद्ध महिलेकडे असलेल्या पर्स व दोन पिशव्यांमध्ये असलेले रोखरक्कम, दागिने व मोबाईल फोन अज्ञात इसमांनी चोरल्याची घटना करंजाडे वसाहतीत घडली आहे.
श्रीमती माधवी नलावडे (वय-70) या से.-3 येथून पायी घरी जात असताना त्यांना रस्त्यात थकवा आल्याने त्यांनी त्यांच्या हातातील व काखेतील पर्स व दोन पिशव्या खाली ठेवून बसल्या असताना त्यांच्या न कळत अज्ञात वस्तूंनी त्या पिशव्यांमधील असलेले रोखरक्कम, दागिने व मोबाईल फोन व इतर कागदपत्रे असा मिळून जवळपास 25 हजारांचा ऐवज चोरल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.