जिल्ह्यात पहिल्या दिवशी 15 ते 18 वयोगटातील 2 हजार 388 लाभार्थ्यांचे झाले कोविड लसीकरण

                                                                 

जिल्ह्यात पहिल्या दिवशी 15 ते 18 वयोगटातील 2 हजार 388 लाभार्थ्यांचे झाले कोविड लसीकरण


अलिबाग,दि.3 (जिमाका):- महाराष्ट्र राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यामध्ये दि.3 जानेवारी, 2022 पासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील युवक-युवतींच्या कोविड लसीकरणास सुरुवात झाली आहे. 

    या वयोगटामधील जिल्ह्यातील युवक युवतींची अंदाजित संख्या 1 लाख 45 हजार 383 असून आज पहिल्या दिवशी रायगड जिल्ह्यात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 2 हजार 388 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. वंदन पाटील यांनी कळविली आहे.