कळंबोली येथील अवाढव्य नाला होणार बंदीस्त-नगरसेवक रविंद्र भगत यांच्या पाठपुराव्याला मिळणार यश
प्रतिनिधी- कळंबोली प्रभाग क्रमांक १० मधील साईबाबा आशिर्वाद सोसायटी ते के.एल.इ कॉलेज पर्यंत असलेल्या उघड्या नाल्यामुळे नागरिकांना दुर्गंधी अस्वच्छता व रोगराईचा सामना करावा लागत होता. हा भलामोठा उघडा नाला बंदीस्त करण्यासाठी नगरसेवक रविंद्र अनंत भगत यांनी महानगरपालिके सोबत वारंवार पत्रव्यवहार केला होता. नगरसेवक रविंद्र भगत यांच्या पाठपुराव्याची दखल पनवेल महानगरपालिका घेत नसल्याने आज कळंबोली प्रभाग क्रमांक १० मधील सोसायटीतील सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, पदाधिकारी व सभासद यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या दालनात बैठक घेत आयुक्तांना या समस्येची माहिती दिली. पनवेल मनपा आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत येत्या सात दिवसात योग्य निर्णय घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. यामुळे कळंबोलीतील नागरिकांना येत्या काही दिवसात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून नगरसेवक रविंद्र भगत यांच्या पाठपुराव्याला यश मिळणार आहे.....*