पोयंजे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात;नदीमध्ये सोडले जात आहे सांडपाणी,नदीपात्रात कचऱ्याचा ढीग

पोयंजे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात;नदीमध्ये सोडले जात आहे सांडपाणी,नदीपात्रात कचऱ्याचा ढीग 


पनवेल / विशाल सावंत 

पनवेल तालुक्यातील पोयंजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वस्तूसिद्धी लँडमार्क या सोसायटीचे सांडपाणी नदीपात्रात सोडले जात असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गावातील महिलांना नदीवर कपडे धुण्यास जाता येत नाही. आणि नदीचे दूषित पाणी पिऊन जनावरे मृत्यूमुखी पडत आहेत. सोसायटीचा कचरा सुद्धा ह्या नदीपात्रात टाकला जातो त्यामुळ पोयंजे गावातील नदी हि संपूर्ण दूषित झाली आहे. वारंवार ग्रामपंचायतीत  तक्रार करून सुद्धा तक्रारीकडे ग्रामसेवक व सरपंच दुर्लक्ष करीत आहेत आसा आरोप पोयंजे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश सिताराम शितकणगे यांनी  केला. नियमानुसार ग्रामपंचायतीने हा कचरा उचलला पाहिजे परंतु तसे होत नसल्याने सोसायटी हा कचरा नदीपात्रात टाकत आहेत . नदीपात्रातील कचरा आणि सांडपाणी या मुळे गावातील नागरिकांचे  आरोग्य धोक्यात आले आहे. आमच्या तक्रारींचे निवारण झाले नाही तर मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत विरोधात आंदोलन करू असा इशारा उपसरपंच गणेश सिताराम शितकणगे यांनी सांगितले. सोसायटीला सुद्धा वारंवार तक्रार केली आहे परंतु तेथील रहिवासी सुद्धा दुर्लक्ष करीत आहेत सोसायटीतील नागरिक हे घरपट्टी भरत नसल्यामुळे ह्या सोसायटीचा कचरा ग्रामपंचायत उचलत नाही परंतु पसरलेल्या घाणीच्या साम्राज्य मुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे ह्या प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या संबंधीत लोकांवर व अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करा अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे. या प्रसंगी भरत भाऊ गायकर,शशिकांत वसंत सोनटक्के, कालुराम अगिवले आदी सहा ग्रामस्थ उपस्थित होते.