डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना शिवसेना नेत्यांनी केले अभिवादन
पनवेल :
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, पनवेल उप महानगरप्रमुख यतीन देशमुख, शिवसैनिक संदीप तांडेल, उप शहरप्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, प्रवीण जाधव, अविनाश गव्हाणकर, भास्कर नारायण भंडारे, सुनील पाटील सर, रणजित शेट्ये आदी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन म्हणजेच त्यांचा स्मृतिदिन पाळण्यात येवून त्यांना अभिवादन केले जाते. डॉ.आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध धर्म पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक 'बोधिसत्व' म्हणून मानतात.
आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवीन पनवेल येथील शबरी हॉटेलच्या मागे असलेल्या जागेत त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच नवीन पनवेल येथील शिवसेनेच्या शाखेत सकाळच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
यावेळी भिमप्रेरणा सांस्कृतिक केंद्र नवीन पनवेलचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे, सचिव प्रकाश कांबळे, जयद्रथ गायकवाड, ई.एस.पवार, नामदेव वाघमारे, धनंजय इंगोले, सुरेंद्र सोरटे, मुकुंद कांबळे, राजेश कांबळे, देवानंद पवार, अनिल मोहिते, शहाजी तासगावकर, शेषराव घांगळे, आर.पी.वानखेडे, राजकुमार रामटेके, सुभाष बागडे, अलका मोरे, प्रकाश बिनेदार, नितीन मोरे, मीनाक्षी गावंडे, तुळशीदास बोबडे आदी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले.