पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन; भातणकरांना नववर्षाची भेट
पनवेल(प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत 'हर घर नल, हर घर जल' नुसार भाताण गावात ७१ लाख ५७ हजार रुपयांची नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार असून या विकासकामांचे भूमिपूजन शनिवार दिनांक ०१ जानेवारी रोजी सायंकाळी ४. ३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
भाताण गावात होणाऱ्या या योजनेचे भूमिपूजन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते होणार आहे.