आमदार .बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उलवे मध्ये स्वच्छता मोहीम,"शे.का.प. आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा पुढाकार"

आमदार .बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उलवे मध्ये स्वच्छता मोहीम,"शे.का.प. आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा पुढाकार"


पनवेल : 29 डिसेंबर 2021 रोजी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार श्री बाळाराम पाटील यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्ष उलवे आणि विरोधी पक्षनेते श्री.प्रितमदादा म्हात्रे यांच्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून उलवे नोड येथे "स्वच्छता मोहिमेचे" नियोजन 26 डिसेंबर रोजी सेक्टर 17 उलवे येथे करण्यात आले आहे.

        या स्वच्छता मोहीमे संदर्भात अधिक माहिती देताना सचिन राजे यांनी सांगितले की आज पर्यंत आम्ही उलवे नोड मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून नागरिकांचे विविध प्रश्न सोडविले अजूनही बऱ्याच समस्या आहेत त्या सुद्धा आम्ही आमचे नेते श्री.नारायणशेठ घरत,श्री.रवीशेठ पाटील,श्री.राजेंद्र पाटील,श्री.जितेंद्र म्हात्रे, श्री.रवींद्र पाटील,सौ.पूजा प्रशांत पाटील, सौ.माईताई भोईर,श्री. सचिन घरत,श्री.अमित घरत,श्री.रोशन म्हात्रे,श्री. हेमंत पाटील,श्री.राजेंद्र घरत,श्री. रमेश ठाकूर,सौ.शिल्पा कडू व इतर मान्यवर नेते यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवू याचा विश्वास येथील नागरिकांमध्ये आहे.
          आठ दिवसापूर्वी शेकापचे नेते आणि पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री.प्रितमदादा म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. त्या कार्यक्रमाला शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला. त्याप्रसंगी नागरिकांनी उलवे नोड मधील बरेचसे गार्डन प्लॉट हे अतिक्रमण आणि डेव्हलप न झाल्यामुळे नागरिकांना वापरात येत नाहीत अशी तक्रार केली. त्याप्रसंगी प्रितम दादांनी सदर प्लॉट आपण सुचवा त्या सर्व प्लॉटवरील स्वच्छतेची जबाबदारी आपण शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून करूया असे सांगितले आणि त्याचाच एक भाग म्हणून आमदार श्री.बाळाराम पाटील साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व नागरिकांच्या वतीने स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी कामगार पक्ष कार्यालय सेक्टर 17 उलवे येथील कार्यालयाच्या ठिकाणी सकाळी नऊ वाजता सदर मोहिमेचा शुभारंभ होईल असे त्यांनी सांगितले.