अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल(प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आठव्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झालेली आहे. यातील पुणे केंद्रांतर्गत प्राथमिक फेरी नुकतीच झाली. नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी येथे भेट देऊन स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.