विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते रांजणपाडा (जासई) येथिल नवीन स्मशानभूमीचे भूमिपूजन

विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते रांजणपाडा (जासई) येथिल नवीन स्मशानभूमीचे भूमिपूजन 



पनवेल : रांजणपाडा (जासई) येथिल नवीन स्मशानभूमीचे भूमिपूजन  पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उरण तालुका पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष श्री.रमाकांत म्हात्रे, ग्रा.पं सदस्य श्री.तेजस पाटील, श्री.एकनाथ घरत, सौ.रुपाली पाटील, मा.सरपंच श्री.धीरज घरत, मा.उपसरपंच श्री.प्रकाश पाटील, मा.उपसरपंच सौ.ममता रमाकांत म्हात्रे मा.उपसरपंच श्री.रमेश पाटील, मा.सदस्य श्री.मुरलीधर ठाकूर, श्री.सुदर्शन पाटील, ग्रामस्थ श्री.संतोष ठाकूर, श्री.श्याम पाटील, श्री.महादेव पाटील, श्री.आदेश पाटील, श्री.संदेश घरत, श्री.मिथुन म्हात्रे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

         रांजणपाडा गावातील जुन्या स्मशानभूमीची जागा रेल्वे प्रकल्पात प्रस्तावित असल्याकारणाने नवीन स्मशानभूमी उभाण्यासाठी उरण तालुका पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष श्री.रमाकांत म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य श्री.तेजस पाटील, श्री.एकनाथ घरत, सौ.रूपाली पाटील व श्री. सुदर्शन पाटील यांनी विशेष प्रयत्न करत रेल्वे प्रशासन, जे.एन.पी.टी व टाटा समूह यांची संयुक्त बैठक घेतली. नवीन स्मशानभूमीसाठी जे.एन.पी.टी कडून भूखंड घेण्यात आले तसेच स्मशानभूमीसाठी लागणार खर्च टाटा समूह करीत आहे. सदर स्मशानभूमी करीता श्री.चंद्रकांत परशुराम पाटील यांनी भूखंड दिल्याबद्दल विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी त्यांचे आभार मानले.