पनवेल तालुक्यात राज्य पुरस्कृत योजना व केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत लाभार्थीची संख्या ४ हजार ९८६

पनवेल तालुक्यात राज्य पुरस्कृत योजना व केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत लाभार्थीची संख्या ४ हजार ९८६

पनवेल : पनवेल तालुक्यात राज्य पुरस्कृत योजना व केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत एकूण ४ हजार ९२० प्रकरणे मंजूर असून त्यात २२ डिसेंबर रोजीच्या बैठकीमध्ये एकूण ६६ प्रकरणे नवीन मंजूर झाल्याने एकूण लाभार्थी संख्या ४ हजार ९८६ झालेली असल्याची माहिती पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यानी दिली.

           सामाजिक व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत योजना व केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनाश्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनाइंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनाइंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनाराष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य इ. योजनांबाबत तहसिलदार पनवेल यांचे अध्यक्षतेखाली तहसिलदार कार्यालय पनवेलयेथे दिनांक २२ डिसेंबर २०२१रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेची ५४श्रावण बाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजनेची ४केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ८ अशी एकूण ६ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.

             पनवेल तालुक्यात राज्य पुरस्कृत योजना व केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत एकूण ४ हजार ९२० प्रकरणे मंजूर असून त्यात २२ डिसेंबर रोजीच्या बैठकीमध्ये एकूण ६६ प्रकरणे नवीन मंजूर झाल्याने एकूण लाभार्थी संख्या ४ हजार ९८६ झालेली आहे.