पनवेलचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांना पितृशोक

पनवेलचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांना पितृशोक




पनवेल( प्रतिनिधी)  नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांचे वडील भरत बाळूशेठ पाटील (डॅडी) यांचे सोमवारी (दि. 25) अल्पशा आजाराने निधन झाले. 71 वर्षीय भरत पाटील हे सिडको युनियनचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्यावर वहाळ येथील स्मशानभूमीत मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, उद्योगपती जे. एम. म्हात्रे, भरत पाटील यांचे पुतणे जि. प. सदस्य रवींद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. कै. भरत पाटील यांच्या पश्चात पत्नी माजी जि. प. सदस्य सुरेखा पाटील, दोन मुलगे संदीप आणि सुनील, मुलगी मनीषा, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.