जवाहर नवोदय विद्यालयात इ. 6 वी व 9 वी च्या प्रवेशाकरिता
ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू
अलिबाग,जि.रायगड दि.07 (जिमाका):- जवाहर नवोदय विद्यालयात सत्र 2022-2023 करिता इयत्ता सहावी व इयत्ता नववीच्या प्रवेशाच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
ऑनलाईन फॉर्म http://www.novodaya.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरता येणार असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख इयत्ता 6 वी करिता दि. 30 नोव्हेंबर 2021 तर इयत्ता 9 वी करिता दि. 31 ऑक्टोबर 2021 आहे, असे जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूरच्या प्राचार्य श्री. किरण इंगळे यांनी कळविले आहे.