कार्यसम्राट लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. ०५) विविध विकासकामांचे लोकार्पण व भुमिपूजन तसेच इतर सामाजिक कार्यक्रम पार पडले

कार्यसम्राट लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारी (दि.  ०५) विविध विकासकामांचे लोकार्पण व भुमिपूजन तसेच इतर सामाजिक कार्यक्रम पार पडले


पनवेल(प्रतिनिधी) कोरोना वैश्विक महामारी आणि महाड येथील दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे जाहीर केले. आणि त्या अनुषंगाने माझ्या वाढदिवसाला हारतुरे, पुष्पगुच्छ, जाहिरात, बॅनर्स यावर खर्च करण्याऐवजी आपणही शक्य तेवढी मदत वा निधी जमा करून पूरग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले होते. त्या आवाहनाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच विविध संस्था, संघटना तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. 
          आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. यानिमित्ताने भव्य दिव्य स्वरूपाचे महाआरोग्य शिबिर याशिवाय अभिष्टचिंतन सोहळाचे आयोजन केले जाते. खांदा वसाहतीतील सि.के. टी महाविद्यालय परिसरात कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या दिवशी पनवेलमध्ये उत्सवाचे स्वरूप दरवर्षी प्राप्त होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि प्रेमाखातर पक्षाचे कार्यकर्ते हितचिंतक मोठ्या प्रमाणात बॅनर आणि फलक लावतात. ठिकाणी होर्डिंग्ज उभारण्यात येतात. दरम्यान अगोदरच आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त बुके न घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्याऐवजी पुस्तके ते दरवर्षी वाढदिवसानिमित्त स्वीकारतात. दरम्यान गेल्या वर्षी सुद्धा कोरोना वैश्विक संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला नाही. यंदाही महामारीचे सावट कायम आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी महाप्रलय आला. महाडमध्ये दरड कोसळून जीवित हानी झाली. अनेकांचे संसार वाहून गेले होत्याचे नव्हते झाले त्यामुळे या वर्षी सुद्धा आपला वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना केले. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे बुके हारतुरे घेऊन येऊ नयेत त्याचबरोबर बॅनर आणि जाहिरातीवर सुद्धा खर्च टाळावा, त्याऐवजी  जितके शक्य होईल तितकी मदत पूरग्रस्तांना करावी असे आवाहन त्यांनी केले होते. त्या अनुषंगाने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच विविध संस्था आणि नागरिकांकडून महाड पूरग्रस्तांना मदत सेवा केली जात आहे. 

पूरग्रस्तांना आ.प्रशांत ठाकूर यांचा सर्वात प्रथम आधार 
 महाड या ठिकाणी आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात या परिसराचे नुकसान झाले. दरड कोसळून काहींचा मृत्यू झाला. दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर आणि लागलीच पूरग्रस्त भागामध्ये धाव घेतली. येथील नागरिकांना धीर आणि आधार देण्याचे काम केले. इतकेच नाही तर तातडीने मदतीचा ओघ सुरु केला.  अन्नछत्राच्या माध्यमातून दररोज सहा हजार नागरिकांना जेवण बनवण्याचे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली खाली अखंडपणे सुरु झाले. शासन, प्रशासनाचा एकही अधिकारी त्या ठिकाणी पोहोचला नव्हता त्यापूर्वीच आमदार प्रशांत ठाकूर हे राज्य व केंद्रातील नेते मंडळींसोबत आणि जिल्ह्यातील युवकांची फौज घेऊन महाडकरांच्या मदतीसाठी धावून गेले आणि एवढेच नाही तर मदतकार्यासाठी तेथेच तळ ठोकून बसले. कोरडा अन्नधान्य, तयार भोजन, पाणी, अल्पोआहार, मेडिकल किट, कपडे, चादर, ब्लॅंकेट, टॉवेल, असे विविध सामुग्री देण्याबरोबरीनेच महाडमधील चिखलाचे साम्राज्य दूर करण्यासाठी यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ पुरवून तात्काळ त्यांनी महाडकरांसाठी मदत कार्य सुरु केले. आणि आजही ते कार्य अखंडपणे सुरु आहे. 

सोशल मिडिया तसेच दूरध्वनीद्वारे शुभेच्छा!
वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सहकार, क्षेत्रातील मान्यवर, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी सोशल मिडिया तसेच दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश बालदी, आमदार रवीशेठ पाटील, आमदार सुभाष भोईर, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार सुभाष चव्हाण, तसेच  सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सहकार, क्षेत्रातील मान्यवर, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी सोशल मिडिया तसेच दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले. 

विविध विकासकांचे लोकार्पण व भूमिपूजन 
कार्यसम्राट लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारी (दि.  ०५) विविध विकासकामांचे लोकार्पण व भुमिपूजन तसेच इतर सामाजिक कार्यक्रम पार पडले. 
 त्यामध्ये विचुंबे येथील शिवम कॉम्प्लेक्स ते ग्रीन व्हॅली पर्यत रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन, केवाळे गावात अंतर्गत गटारे बांधणे कामाचे भुमिपूजन, दुदरे ते शिवणसई रस्त्याचे उदघाट्न, रिटघर येथे नारायण उसाटकर ते दत्तमंदिर पर्यंत अंतर्गत रस्ता व गटार करणे कामाचे भूमिपूजन झाले. तसेच हरिग्राम ठाकूरवाडी येथे गरिब व गरजूंना तालुका युवा मोर्चाच्या वतीने ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.        
 भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ओबीसी नेते एकनाथ देशेकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.