ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेसाठी मागणी
पनवेल : वार्ताहर
पनवेल येथे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे जन आशीर्वाद यात्रेसाठी आले असता आगरी समाज हॉल मध्ये ओबीसींची जात निहाय जनगणना व्हावी यासाठी भाजपाचे भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी निवेदन दिले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसींची जनगणना २०२१ मध्ये होणार असे जाहीर केले होते परंतु कोविड या महामारीमुळे ते चालू करता आले नाही. म्हणूनच यापुढील काळात याच ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी भाजपाचे भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी कपिल पाटील यांच्याकडे केली. यावेली पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुद्धा यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. व कपिल पाटील यांनी ही मागणी पंतप्रधानांपर्यंत पोहोचू असे आश्वासन दिले.