जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थे च्या वतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न

 जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थे च्या वतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न



 कोरोना या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे व त्यांना डायबेटीस, रक्तदाब या सारख्या शारीरिक व्याधींची माहिती करून देण्याच्या दृष्टीने जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने  ' आरोग्य सेविका आपल्या दारी ' या कार्यक्रमांतर्गत पनवेल मधील गावदेवी पाडा येथील परिसरात आरोग्य शिबिराचे आयोजन केले जात असून सोमवार दि. ३० ऑगस्ट रोजी पनवेल शहरातील गावदेवी पाडा येथे हे शिबीर कोरोनाच्या शासकीय नियमांचे पालन करून राबविले गेले . पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम दादा म्हात्रे ह्यांच्या मार्गदर्शना खाली हा उपक्रम राबवित आहेत. ह्यावेळी गावदेवी पाडा येथील श्री स्वामी समर्थ मठाधिपती सुधाकर भाऊ घरत, श्री प्रकाश घरत,नरेश मुंढे, सुरज बहाडकर, मंगेश भोईर उपस्थित राहून तपासणी करून घेतली.  यावेळी रक्तदाब, मधुमेह, ऑक्सिजन लेव्हल यांची तपासणी घरोघरी जाऊन करण्यात आली.