शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात
पनवेल दि.06 (वार्ताहर): पनवेल परिसरातील शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या वतीने पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गाव वाकण, व बौद्धवाडी येथे मदत गृहोपयोगी वस्तू व कपड्यांची मदत करण्यात आली
यावेळी पोलादपुर तहसीलदारमध्ये शिवराज प्रकल्पगस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शिवसेना स्थानिकनेते विश्वास जगन्नाथ पेटकर यांना नायब तहसीलदार पोलादपूर आदमुठे यांच्या हस्ते संस्थेला प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी ससाणे (उपलेखापाल), परशुराम पाटील (महसूल सह्ययक), आशिष मोरे (कोतवाल) स्थानिक नारायण साने व हरीचंद्र पेटकर, सुरेश पाटील,व निलेश पाटील उपस्थित होते. यावेळी शिवराज प्रकल्पगस्त सामाजिक संस्थेचे प्रवीण पाटील(उपाध्यक्ष), प्रदीप पाटील (खजिनदार), राज दरे (सचिव),दिलीप पाटील,सचिन पाटील,विकास पेटकर, योगेश भोईर, गोविंद गडगे,दिनेश भोईर,समित पालेकर,आकाश पेटकर, रोशन पाटील,अतुल पाटील,नरेश म्हात्रे,भालचंद्र पेटकर,राहुल पाटील,ओंकार पाटील यांनी मेहनत घेतली.